पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटलांनी मास्टर प्लॅन आखला आहे. तसेच, त्यासाठी 850 कोटी लागणार आहेत आणि हे पैसे राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका अर्धे अर्धे भरणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
आज चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. यावेळी या बैठकीमध्ये मिसिंग लिंक म्हणजे शहरातील अनेक जागा मालकांनी न दिल्याने रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा प्रमुख मुद्दा बैठकीचा होता.
गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोर जावं लागतं आहे. त्यात मेट्रोचे काम सुरु असून सर्व मार्ग सुरु होण्यास आणखी काही कालावधी लागू शकतो असे सांगण्यात येत आहे. अशाच चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेत मास्टर प्लॅन आखला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
अनेक परिसरातील रस्त्यांची कामं ही जागा मालकांनी जागा न दिल्याने होत नाहीत. जागामालक जागा देत नाहीत त्यामुळं मिसिंग लिंकला अडचणी निर्णाम होत आहेत. त्यामुळं जागा लवकर ताब्यात घेण्यासाठी मदत करणा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शहरात 33 मिसिंग लिंक आहेत. त्यामध्ये 15 कोथरुडमधील आहेत. त्या जागा ताब्यात घेण्यासाठी 850 कोटी पैसे लागणार आहे. त्यापैकी अर्धे पैसे राज्य सरकार आणि अर्धे पैसे महानगरपालिका देईल असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
तसेच, लवकरच शहरातील मिसिंग लिंकसाठीचा जमीन अधिग्रहणाचा प्रश्न सुटेलय ज्या कोणाची जागा असेल त्यांना बोलून घेऊ. शहर मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळं शासनाकडे मागणी करुण मागण्या मान्य करुन घेऊयात. अतिक्रमण असेल किंवा ड्रग्स असले याच नागरिकांवर दबाव आणणे गरजेचे आहे. पैसे नाहीत म्हणून पुणे महापालिकेचे कोणतेही काम आता थांबणार नाही, कात्रज कोंढवासंर्भात लवकरच निर्णय घेऊन काम केले जाईल अशी ग्वाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.




