पिंपरी : दापोडी येथील पवार वस्तीमध्ये दोन रिक्षा आणि सहा दुचाकी अशा आठ वाहनांची कोयत्याने तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी फिरोज इर्शाद शेख यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे रिक्षाचालक आहेत. शनिवारी रात्री त्यांनी रिक्षा घराजवळ उभी केली. रात्रीच्या वेळी आरोपींनी शेख यांच्या रिक्षाची तोडफोड केली. त्यानंतर रविकुमार वेणू गोपाल यांच्याही रिक्षाची आणि परिसरातील दुचाकी वाहनांची तोडफोड केली.
पिंपरीतील वाहन तोडफोडीच्या घटना
२५ डिसेंबर – ओटास्कीम, निगडी
३० डिसेंबर – मोशी
३१ डिसेंबर – बालाजीनगर, भोसरी
१ जानेवारी – आळंदी आणि भोसरी
४ फेब्रुवारी – आळंदी फाटा
९ फेब्रुवारी – चिखली
१५ फेब्रुवारी – दापोडी




