संभाजीनगर(चिंचवड) : संभाजीनगर प्रभागातील साई उद्यान मागील चार वर्षांपासून विकासाच्या मार्गावर आहे, पण अद्याप या उद्यानाच्या 40% कामांचा प्रगती दाखवणारा लेखाजोखा पूर्ण होऊ शकलेला नाही. महापालिकेने या उद्यानात 19 विविध विभाग तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ज्यामध्ये फुलणारी झाडे, ओपन जिम, ध्यान क्षेत्र, बटरफ्लाय गार्डन, योग कमी, स्केटिंग रिंग आणि विविध प्रकारची वनस्पतींची लागवड यांचा समावेश होता. तथापि, या सर्व उद्दिष्टांचा प्रत्यक्षात काहीच ठोस काम होताना दिसत नाही.

साई उद्यानाच्या अवस्थेची पाहणी केल्यावर, हे स्पष्ट होते की, इतर विभागांच्या तुलनेत त्याचे व्यवस्थापन व विकास अपुरा आहे. गार्डनमधील एकही विभाग पूर्णत्वास गेला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाकडून पुरवण्यात येणारे सुरक्षा रक्षक मात्र कागदावर असल्याचे दिसतात. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर त्यांचे अस्तित्व जाणवलेले नाही.
ओपन जिममधील साहित्य तुटलेले असून वॉकिंग ट्रॅकवरील झाडे आणि वेली काढण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. यासोबतच, समुद्राच्या रेतीने तयार केलेला भाग देखील खराब स्थितीत आहे. अनेक झाडांच्या बाजूला रान गवताची झुडपे वाढलेली आहेत, त्यामुळे ते झाडे दीर्घकाळ टिकतील का, हा प्रश्न निर्माण होतो.


दोन गार्डनमध्ये महापालिकेचा व्यवस्थापनाची तफावत

तथापि, शेजारीच असणारे कृष्णानगर प्रभागातील जॉगर्स पार्क गार्डनमध्ये महापालिकेचे व्यवस्थापन अधिक उत्कृष्ट दिसते. त्या गार्डनमध्ये नियमितपणे झाडांची निगा राखली जात आहे, गवताची छाटणी केली जात आहे आणि पाण्याचे व्यवस्थापन ठीक आहे. जॉगर्स पार्क आणि साई उद्यान यांमध्ये केवळ एक भिंत आहे, तरी जॉगर्स पार्कचा ठसा अधिक नीटनेटका आहे. यावरून दोन्ही गार्डनमधील व्यवस्थापनातील मोठा फरक स्पष्टपणे समोर येतो.
वाढत्या लोकसंख्येसोबत या गार्डन्सचे व्यवस्थापन अधिक लक्ष देऊन केल्यास स्थानिक नागरिकांना अधिक चांगला अनुभव मिळू शकतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दहा हजार कोटी कडे वार्षिक बजेट असताना आहे शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या उद्यानांची व्यवस्थापन का वेळेत पूर्ण होत नाही असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यातून महापालिका प्रशासन काही संदेश घेणार का? असा सवाल फिरायला येणाऱ्या नागरिकांनी जनशक्ती न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.




