
पुणे : इंदिरा शिक्षण समूहाच्या इंदिरा विद्यापीठाचे संकेतस्थळ, बोधचिन्ह आणि टॅगलाइनचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच अनावरण झाले.
विद्यापीठाच्या अध्यक्ष डॉ. तरिता शंकर, विश्वस्त सरिता वाकलकर, कुलगुरू डॉ. अनघा जोशी, शैक्षणिक सल्लागार प्रा. चेतन वाकलकर, बाबा जाधवराव, वसंत म्हस्के, शार्दूल गांगल, साहिल मेहेंदळे, शान मेहेंदळे, राजीव बन्सल, मनीष दालमिया या वेळी उपस्थित होते.
‘शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्य आणि अमर्याद संधींचे केंद्र असलेल्या इंदिरा संस्थेचे शैक्षणिक योगदान वाखाणण्याजोगे असल्याने संस्थेच्या विद्यापीठाला मान्यता देण्यात आली. शैक्षणिक संस्थांच्या चांगल्या-वाईट कामावर माझे बारकाईने लक्ष आहे. चुकीचे काम करणाऱ्यांची मान्यता रद्द केली जाईल,’ असे पाटील यांनी सांगितले. ‘उद्याोग आणि शिक्षण यातील दरी भरून काढण्यासह रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासावर विद्यापीठाद्वारे भर दिला जाईल’ असे डॉ. तरिता शंकर यांनी नमूद केले.




