देवा भाऊ बुलडोझर चलाओ…

दरम्यान आज मुंबईत भाजपाच्या एका कार्यकर्त्याने, वांद्रे येथील एजेएल हाऊससमोर ‘देवा भाऊ बुलडोझर चलाओ’ असे हिंदीत लिहित ‘नॅशनल हेराल्डची मालमत्ता पाडण्याची मागणी करणारे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशिष शेलार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही फोटो आहेत.

ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्रात म्हटले आहे की, “काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डची मूळ कंपनी एजेएलची २००० कोटी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी एक गुन्हेगारी कट रचला होता. यासाठी त्यांनी ९९ टक्के शेअर्स फक्त ५० लाख रुपयांना त्यांची खाजगी कंपनी यंग इंडियनला हस्तांतरित केले, ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी सर्वात मोठे भागधारक आहेत.”

आरोपत्रात इतर कोणाची नावे?

९ एप्रिल रोजी दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रातील इतर आरोपींमध्ये काँग्रेस नेते सुमन दुबे, सॅम पित्रोदा, यंग इंडियन, डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या आणि सुनील भंडारी यांचा समावेश आहे.

ईडीने पीएमएलएच्या कलम ४४ आणि ४५ अंतर्गत मनी लाँडरिंगचा गुन्हा तसेच कलम ७० (कंपन्यांकडून गुन्हे) अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने पीएमएलएच्या कलम ४ अंतर्गत आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या कलमाअंतर्गत, एखाद्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिल रोजी निश्चित केली आहे.