
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज क्रांतिवीर चाफेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाचे लोकार्पण केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या खास शैलीत मराठी – हिंदी सक्तीची शाळा घेतली. ते म्हणले, ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही ते हिंदी भाषेचा विरोध करत आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली मातृभाषा आहे.
तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळें हिंदीला विरोध करण्याचे काही कारण नाही. कारण की मराठी आपली मातृभाषा आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली.
यावेळी नाशिक येथे झालेल्या दंगलीबाबतही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. नाशिक दंगली प्रकरणात आम्ही कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करत आहोत. कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
