Follow Usbookmark

पिंपरी : देहूरोड येथे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मीस्टाईल धरपकड झाली. ही घटना मध्यरात्री दोन च्या सुमारास घडली आहे. मुस्तफा मोबिन खान आणि मुस्तकीन मोबिन खान अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही सख्या भावांची नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन च्या सुमारास देहूरोड येथे गॅस कटर ने एटीएम फोडण्याचा प्रयत्न खान टोळीचा होता. दोघांसह एकूण पाच जण एटीएम फोडण्याचा तयारीत होते. गस कटरने एटीएम फोडणार तेवढ्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. इतर तीन चारचाकी गाडीतून फरार झाले आहेत. पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मीस्टाईल मारामारी झाली.




