पिंपळे सौदागर : १८ जून २०२५
पिंपळे सौदागर येथील रिषभ प्रतिभा गणेश काटे यांनी जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या नेव्ही टेक्निकल एंट्री स्कीम (Navy Tech Entry Scheme) अंतर्गत SSB इंटरव्ह्यू यशस्वीरित्या उत्तीर्ण केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे.
या विशेष यशाबद्दल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी रिषभ याचे अभिनंदन केले आणि पुढील सेवावाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “रिषभ यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आहे. देशसेवा करण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट असून, त्यांनी हे यश मेहनतीने आणि चिकाटीने मिळवले आहे.
रिषभ काटे यांचे वडील गणेश काटे आणि आई प्रतिभा काटे यांचे देखील विशेष योगदान या यशामागे असून परिसरातून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.