पिंपळे सौदागर : चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी IIT प्रवेश परीक्षा (JEE Advanced आणि JEE Mains) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे! विद्यार्थ्यांचे अध्यक्ष संदीप काटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अरहंत प्रकाश भोसले (इयत्ता १२वी) याने IIT साठी यशस्वीपणे पात्रता मिळवली असून, त्याला IIT रोपार, IIT मंडी आणि IIT इंदूर या देशातील अग्रगण्य संस्थांकडून प्रवेशाच्या ऑफर प्राप्त झाल्या आहेत. अमोध अमित औटी याने JEE Advanced मध्ये 5261 रँक आणि JEE Mains मध्ये 1717 रँक मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे. तो IIT कानपूर किंवा IIT मद्रास या संस्थांमध्ये बायोसायन्सेस / बायोकेमिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांनी दाखवलेली कठोर मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि शाळेच्या मार्गदर्शनाचा हा उत्कृष्ट परिणाम आहे.
शाळेचे अध्यक्ष संदीप काटे आणि प्राचार्य श्रीमती सुविधा महाले यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “ही यशोगाथा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण शाळेसाठी प्रेरणादायी आहे. या उज्वल यशासाठी अरहंत, अमोध आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन:पूर्वक अभिनंदन! आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देतो असे संदीप काटे यांनी म्हटले आहे.