पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने भव्य पुणे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तसेच अजितदादा पवार यांच्या कार्यप्रवृत्तीचा आदर्श घेत खेळाच्या माध्यमातून युवकांना संघभावनेचा व खेळातील चिकाटीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांनी स्वतः कॅरम खेळण्याचा आनंद घेतला आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना मनोबल व प्रोत्साहन दिले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, भोसरीचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्ञानेश्वर कांबळे, फजल शेख, बबनराव गाढवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक संजय वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.