वाकड | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २५ व २६ मधील नागरिकांसाठी “आपला आमदार आपल्या दारी” हा विशेष उपक्रम १९ जुलै २०२५ रोजी वाकड येथील हॉटेल बर्ड व्हॅली येथे उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे नेतृत्व चिंचवडचे आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांनी केले. सेवा, संवाद आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या या उपक्रमात शासन थेट नागरिकांच्या दारात पोहोचत आहे. यावेळी माजी नगरसेवक संदीप कस्पटे, राम वाकडकर, सचिन साठे माजी नगरसेविका आरती चोंधे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांची माहिती, तसेच दाखले, रेशनकार्ड, वीज, पाणी, ड्रेनेज, रस्ते व महापालिकेशी संबंधित समस्यांबाबत नागरिकांनी थेट तक्रारी मांडल्या. या तक्रारींवर आमदार शंकरभाऊ जगताप यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
उपस्थित अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
या उपक्रमात महापालिका, महसूल, जलविभाग, विद्युत वितरण, सामाजिक न्याय व इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवर जागीच उत्तर मिळाले व अनेक प्रकरणांवर तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आली.
नागरिकांकडून समाधानाची भावना
नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आमदार शंकरभाऊ यांच्या कामकाजाच्या तत्परतेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “याप्रमाणे आमदार थेट लोकांमध्ये येऊन प्रश्न ऐकतात व लगेचच निर्णय घेतात, तेव्हा प्रशासनही उत्तरदायी राहते आणि आम्हाला विश्वास वाटतो की आपले प्रश्न सुटू शकतात. “आपला आमदार आपल्या दारी” उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सशक्त होत आहे, ज्याचा थेट लाभ सामान्य नागरिकांना मिळतो आहे.