मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, कामांची प्रगती, अडचणी व उपाययोजना यासंदर्भातील सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांसमोर सादर केली.
पंढरपूर हे राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, ‘पंढरपूर कॉरिडॉर’ हा प्रकल्प भाविकांच्या सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पात गती आणण्याचे निर्देश दिले. तसेच, “प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीतील मुख्य मुद्दे:
- कामांच्या टप्प्यानुसार सद्यस्थितीचा आढावा
- स्थलांतरित कुटुंबांसाठी पुनर्वसनाचे नियोजन
- वाहतूक व्यवस्थापन, रस्ते व पायाभूत सुविधांचा आराखडा
भाविकांसाठी आधुनिक सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या बैठकीत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. लवकरच या प्रकल्पाच्या पुढील टप्प्याची कामे सुरू होतील, अशी माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.