पुणे | २० जुलै २०२५
पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. गांजवे चौकात लावलेल्या फ्लेक्सवर शिंदे यांचे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे व्यंगचित्र झळकत असून, त्याखाली “काळी दाढीवाला माझा लकी कबूतर” असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
हा बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, सोशल मीडियावरही तो चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाजपशी वाढलेल्या जवळीकीवर आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर हे सार्वजनिक टीकास्त्र असल्याचे मानले जात आहे.
या बॅनरबाजीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली, तरी दोन्ही गटांतील संघर्ष आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.