मोशी | २१ जुलै २०२५
संतपरंपरेचा गौरवशाली वारसा आणि भक्तीचा महापूर अनुभवणारा एक अद्वितीय क्षण — संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या ३०५व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीमध्ये माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचा ऐतिहासिक भेट सोहळा होणार आहे.
या पावन सोहळ्याचा एक भाग म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन आता मोशी परिसरातील भाविकांना घेता येणार आहे. भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
✨ दर्शनाचा विशेष कार्यक्रम – मोशी येथे
🔹 दिनांक : २१ जुलै २०२५ (सोमवार)
🔹 वेळ : रात्री ७.३० वा.
🔹 ठिकाण : पकवान हॉटेल जवळ, बारणे पाटील चौक, डिमार्ट शेजारी, मोशी, पुणे
या पालखी दर्शनासाठी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिल्वर ग्रुपचे अध्यक्ष संतोष बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष अतिश आनंदराव बारणे यांनी केले आहे.
भाविकांसाठी एक भक्तिपूर्ण पर्वणी
माऊलींच्या पालखीचे दर्शन म्हणजे आत्मिक समाधान आणि अध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याचा योग. पावन संतांची आठवण, टाळ-मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा जयघोष या वातावरणात मोशी परिसरात भक्तीमय वातावरण अनुभवता येणार आहे.
संत परंपरेचा गौरव
या पालखी सोहळ्याद्वारे महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा अधिक समृद्ध होत आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे केवळ भक्तीचे नव्हे तर सामाजिक जागृतीचेही प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या पालख्यांचे एकत्र दर्शन ही भाविकांसाठी अभूतपूर्व अनुभूती ठरणार आहे.