- नाना काटे सोशल फाउंडेशन, ब्रिजेस सिंग व दुर्गेश सिंग यांच्या वतीने भव्य आयोजन
पिंपळे सौदागर : उत्तर भारतीय बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा “छठ पूजा” हा सण आज पिंपळे सौदागर येथे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांच्या उपस्थितीत नाना काटे सोशल फाउंडेशन, तसेच ब्रिजेस सिंग व दुर्गेश सिंग यांच्या वतीने अत्यंत श्रद्धा, आस्था आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सूर्यदेवाच्या उपासनेद्वारे निसर्ग, कुटुंब आणि समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा सुंदर क्षण अनुभवता आला. सायंकाळी आणि प्रात:काळी दिल्या जाणाऱ्या अर्घ्याने वातावरण भक्तीमय झाले होते. महिलांनी पारंपरिक वस्त्रांमध्ये, तर पुरुषांनी धार्मिक विधींमध्ये सहभागी होत छठ मइयाची आराधना केली.
भगवान सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून चार दिवसीय छठ पर्वाचा शुभ समारोप झाला. छठी मइयाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी मन:पूर्वक प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमात युवानेते उमेश काटे तसेच पिंपळे सौदागर परिसरातील उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक गीत, पूजा विधी आणि सामूहिक प्रार्थनेने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. या निमित्ताने नाना काटे सोशल फाउंडेशनने सामाजिक सलोखा, सांस्कृतिक एकता आणि श्रद्धेचा संगम घडवून आणत पिंपळे सौदागर परिसरात एकतेचा संदेश दिला.




