भोसरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका एरवी अनधिकृत होर्डिंग्सवर गाजरफटकार कारवाई करताना दिसते. पण भोसरी विधानसभा मतदारसंघात मात्र नियमांना पायमल्ली देत फ्लेक्सचा उच्छाद माजल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रिव्हर सायकल स्पर्धेच्या नावाखाली सिग्नल, मुख्य चौक, अरुंद गल्ली-बोळ, गार्डन कंपाउंड, आणि आता तर थेट गार्डनच्या आतच बिनधास्त अनधिकृत फ्लेक्स झळकवण्यात आले आहेत.
या उघड उघड अतिक्रमणावर महापालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र आंधळा-बधिर झाल्याचे नागरिकांचे स्पष्ट आरोप आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे फ्लेक्स जाणीवपूर्वक ठिकठिकाणी लावूनही प्रशासन निष्क्रिय राहणे ही दुर्लक्षापेक्षा थेट संगनमताची शंका निर्माण गोष्ट आहे.
शहरात सर्वसामान्यांच्या छोट्या फलकांवर कारवाईचा दंडाचा बडगा दाखवणारे प्रशासन, राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांबाबत मात्र पूर्ण अबोल अभयदान देताना दिसते. यामुळे नागरिकांच्या मनात थेट सवाल उभा राहिला आहे की, “सामान्य जनतेसाठी कायदा वेगळा आणि राजकीय नेत्यांसाठी वेगळा? प्रशासनाची ही दुहेरी भूमिका किती दिवस चालणार?”
भोसरीतील नागरिकांनी या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर तातडीने कारवाई करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी सामान्य पिंपरी चिंचवडकर करताना दिसत नाही.




