- तळवडेत राष्ट्रवादीचा गड अबाधित; २०२६ मध्ये चौकार पुन्हा निश्चित!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे–रूपीनगर प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहील. प्रभागातील अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विकास कामांना पूर्तता केले आहे. त्यामुळे जनतेचा पाठिंबामुळे पुन्हा राष्ट्रवादीला यश मिळेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. २०१७ प्रमाणेच २०२६ च्या महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.
तळवडे प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भालेकर, शरद भालेकर, सीमा भालेकर आणि चारुलता सोनवणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकासकामांमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते.
विकासकामांचा लेखाजोखा मांडला…..
अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तळवडे व रूपीनगर प्रभागात रेडझोन असूनही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याचे गव्हाणे यांनी स्पष्ट केले. यामध्ये पूर्ण झालेली कामे…
रेडझोन मालमत्तांना ५० टक्के मालमत्ता कर सवलत
५९ एकर गायरान जमीन महापालिकेकडे हस्तांतरित
बायोडायव्हर्सिटी प्रकल्प, क्रीडा व युवकांसाठी उपक्रम
वीज उपकेंद्रासाठी MIDC कडून ३२ गुंठे जागा
तळवडेत स्वतंत्र तलाठी कार्यालय सुरू
मिळकत विभाजनासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सुविधा
या सर्व कामांसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी गेल्या नऊ वर्षांत रेडझोनची अडचण असतानाही सातत्याने प्रयत्न केल्याचे गव्हाणे यांनी नमूद केले. यापुढील काळात विकासासाठीही ठोस पावले उचलली जात असल्याचे सांगत गव्हाणे म्हणाले, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांच्या कामात रेडझोन शेतकऱ्यांना १००% TDR, तळवडे येथे सुसज्ज रुग्णालयासाठी MIDC इमारत महापालिकेला देण्याचा प्रस्ताव अशा विकास कामांना मूर्त स्वरूप द्यायचे आहे. आणि ते काम केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच पूर्ण करता येईल असं विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उमेदवार पंकज भालेकर म्हणाले,
“अजितदादांच्या मार्गदर्शनामुळे प्रभागाचा विकास वेगाने होत आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रेडझोनसारख्या अडचणी असूनही जनतेने राष्ट्रवादीवर दाखवलेला विश्वास २०२६ मध्येही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत भालेकर यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले. यावेळी सभेत हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस सठी जोरदार नारा देत राष्ट्रवादीच्या उमेदवरांना पाठिंबा दर्शविला.




