पिंपळे सौदागर, दि. २ जानेवारी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचाराला जोर आला आहे. गुरुवारी (दि. २) रोजी पिंपळे सौदागर परिसरातील शिवार गार्डन, कुणाल आयकॉन, विश्वशांती कॉलनी आदी भागांमध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन जनसंपर्क मोहीम राबवली.
या भेटी दरम्यान नागरिकांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सोयीसुविधा तसेच प्रलंबित विकासकामांबाबतच्या समस्या मांडल्या. यावर काटे कुटुंबीयांनी प्रत्येक मुद्द्याची नोंद घेत समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
“आपलं मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणजेच विकासाला” या संकल्पनेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध विकासाभिमुख योजना, पायाभूत सुविधा आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
निवडणूक जवळ येत असल्याने प्रभाग क्रमांक २८ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत बैठका, जनसंपर्क सभा व प्रचार मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.




