वाकड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २५ (ताथवडे–पुनावळे–वाकड) येथून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन पवार यांनी थेट मैदानात उतरून राजकीय वातावरण तापवले आहे. शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ताथवडे येथील ग्रामदैवत नरसिंह मंदिरात त्यांच्या प्रचाराचा भव्य आणि शक्तिप्रदर्शनात्मक शुभारंभ होणार आहे.
देवदर्शनाने चेतन पवार यांच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. त्यानंतर संपूर्ण प्रभागात प्रचार फेरी आणि रॅली काढण्यात येणार असून, नरसिंह मंदिर, म्हातोबा मंदिर, गणेश मंदिर, पंचशील नगर, नरसिंह चौक आदी भागांतून ही रॅली जाणार आहे. या माध्यमातून शिवसेना (उबाठा) थेट जनतेशी संवाद साधत, सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर बोट ठेवणार आहे.
ताथवडे परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर मागील 14 वर्षे पासून भागात राजकीय दुष्काळ, विकास थांबला.
या प्रभागातून गेल्या काही वर्षांहून अधिक काळ खुल्या प्रवर्गातील लोकप्रतिनिधी महापालिकेत पोहोचू शकले नाहीत.
डीपी रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित, पाणीपुरवठ्याचा गंभीर गोंधळ,
अंतर्गत रस्ते, नागरी सुविधा दुर्लक्षित, नागरिकांचे प्रश्न मांडणारा ठाम आवाजच नव्हता याचा थेट फटका ताथवडे–पुनावळे–वाकडमधील नागरिकांना बसला.
चेतन पवार : प्रभागाचा हरवलेला आवाज?
याच पार्श्वभूमीवर चेतन पवार यांच्या उमेदवारीकडे ‘पर्याय’ म्हणून नव्हे तर ‘ भागाची विकासाची गरज’ म्हणून पाहिले जात आहे. स्थानिक नागरिक, युवक, महिला आणि वंचित घटक एकवटत “आपकी बार चेतन पवार” असा स्पष्ट आणि आक्रमक नारा देत रस्त्यावर उतरले आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, “हा प्रचार फक्त उमेदवारीचा नाही, तर दशकभराच्या दुर्लक्षाविरोधातील जनतेचा उद्रेक आहे. शिवसेना (उबाठा) आक्रमक मोडमध्ये
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी शक्तिप्रदर्शन करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या प्रभागात थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. रॅली, घोषणा, जनसंवाद आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे प्रभाग २५ मधील लढत आता खऱ्या अर्थाने रंगणार आहे.
आता प्रश्न एकच, दशकभर दुर्लक्षित राहिलेल्या प्रभागाला अखेर आपला हक्काचा आवाज मिळणार का? की पुन्हा एकदा आश्वासनांवरच बोळा फिरणार? उत्तर मतपेटीत बंद होणार आहे आणि चेतन पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभाने या लढतीचा खरा श्रीगणेशा झाला आहे.




