ताथवडे, ३ जानेवारी २०२६
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी विधीवत नारळफोडीने सुरू करण्यात आला.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार
(अ) श्री. सागर विजय ओव्हाळ आणि
(ड) श्री. चेतन अण्णा पवार
यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री नरसिद्ध मंदीर येथे माजी मंत्री, शिवसेना नेते व विधान परिषद सदस्य मा. सचिन अहिर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर ताथवडे गावठाणातून भव्य प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांचा भव्य प्रचार दौरा ताथवडे गावठाण येथून उत्साहात सुरू झाला.
या दौऱ्यास माजी गृहनिर्माण राज्यमंत्री तथा शिवसेना नेते सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाच्या प्रेरणेने प्रचार दौऱ्याची प्रभावी वाटचाल सुरू झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, परिवर्तनाची लाट जाणवली. प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, विकासकामे आणि लोकशाही मूल्यांबाबत संवाद साधण्यात आला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेम व पाठिंबा पाहता प्रभागात परिवर्तनाची लाट स्पष्टपणे जाणवत असल्याचे यावेळी बोलले जात होते.
विकास, विश्वास आणि लोकशाही मूल्यांसाठीचा लढा अधिक बळकट
“हा केवळ निवडणूक प्रचार नसून विकास, विश्वास आणि लोकशाही मूल्यांसाठीचा संघर्ष आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना (उ. बा. ठा.) गटाचा प्रचार वेगाने वाढत असून, आगामी काळात प्रचाराला आणखी गती मिळण्याची चिन्हे आहेत.




