पिंपरी–चिंचवड : ३ डिसेंबर २०२६
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जबरदस्त ताकद उभी करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तळवडे–रुपीनगर परिसरात विकास, विश्वास आणि ठाम नेतृत्वाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात सुरू असून विरोधक मात्र आपुलकीच्या नावाखाली गुंडगिरी व दहशत माजवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आला आहे.
या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर, शरद भालेकर, स्मिता भालेकर आणि चारुलता सोनवणे हे चारही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असून जनतेकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रेडझोन असतानाही विकासाची गंगा
हा परिसर रेडझोन बाधित असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तळवडे भागाला विकासापासून वंचित राहू दिले नाही. “जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळेच विकासाचे ठोस निर्णय घेता आले, चाकण औद्योगिक वसाहत व तळवडे आयटी पार्ककडे जाणाऱ्या कामगारांमुळे या भागात दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.
➡️ रेडझोन बाधित शेतकऱ्यांना १०० टक्के मोबदला (TDR) देण्यासाठी प्रस्ताव तयार
➡️ राज्य शासनाची मंजुरी अंतिम टप्प्यात
➡️ उड्डाणपूल उभारणीबाबतही सकारात्मक हालचाली
“या प्रभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम शब्द अजित पवार यांनी दिला आहे. यासाठी सर्व पर्याय रस्ते विकसित करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.
तळवडे–रुपीनगर प्रभागासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पंकज भालेकर यांनी केलेला पाठपुरावा
🔹 रेडझोन बाधित मिळकतधारकांना मालमत्ता करात ५०% सवलत – ऐतिहासिक निर्णय
🔹 तळवडे येथील ५९ एकर गायरान जमीन पालिकेकडे हस्तांतरित
➡️ तळवडे येथे शहरातील सर्वाधिक भव्य बायोडायव्हर्सिटी प्रकल्प
➡️ ७ एकर जागेत क्रीडा व युवक उपक्रम
🔹 MIDC कडून वीज उपकेंद्रासाठी महावितरणला ३२ गुंठे जागा
🔹 स्वतंत्र तलाठी कार्यालय – चिखलीला जाण्याची झंझट संपली
🔹 एकत्र कुटुंब मिळकत विभाजनासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रक्रिया
🔹 वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी २ कोटी ६२ लाख निधी मंजूर
🔹 देहू–आळंदी रस्त्यावर संत तुकाराम महाराज प्रवेशद्वाराचे भव्य काम सुरू
आरोग्य सुविधा आणि रेडझोनचा अडसर यावरती तोडगा काढण्यासाठी आणि तळवडे भागात अद्याप सुसज्ज महापालिका रुग्णालय नसल्याची खंत व्यक्त होत असताना तळवडे एमआयडीसी मधील राज्य सरकारच्या इमारतीची महापालिका रुग्णालयासाठी पाहणी
➡️ MIDC ची उपलब्ध इमारत मनपाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला
➡️ राज्य शासनाची मंजुरी लवकरच अपेक्षित आहे
“अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे,” असे आवाहन माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या वतीने करण्यात आले.
विरोधकांची दहशत, राष्ट्रवादीचा निर्धार
विरोधकांकडून परिसरात दबाव, दहशत आणि गुंडगिरीचे प्रकार सुरू असून याला राष्ट्रवादी काँग्रेस भीक घालणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. कुठलाही भाई–दादा आला तरी घाबरू नका. मी तुमच्यासोबत आहे आणि कायम राहीन,” असे ठाम शब्द भालेकर यांनी नागरिकांना दिला आहे. “यावेळीही विकासासाठी, विश्वासासाठी आणि निर्भीड नेतृत्वासाठी चारही उमेदवारांना निवडून द्या,” असे आवाहन करण्यात आले




