जनशक्ती न्यूज..
पिंपरी (प्रतिनिधी) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये तांत्रिक कारणास्तव राहिलेल्या अपक्ष अर्जाबाबत मतदारांनी गैरसमज करू नये. प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपचे अधिकृत सुशिक्षित सर्व उमेदवार विलास मडिगेरी, डॉ. सुहास कांबळे, नम्रता लोंढे, निलम लांडगे यांनाच मतदान करावे असे आवाहन प्रचारफेरीत सहभागी होत अभिषेक मडिगेरी यांनी केले.
महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ (ड) इंद्रायणीनगर, बालाजीनगर, संतनगर या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी यांच्याबरोबर त्याचे पुत्र अभिषेक मडिगेरी यांचा डमी उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणाने अपक्ष म्हणून राहिलेला आहे. याबाबत सोमवारी (५ जानेवारी) काढलेल्या सेक्टर ७ मधील विविध सोसायटी मध्ये घर to घर प्रचारफेरीतून प्रभागातील मतदारांनी कोणताही गैरसमज न करता भाजपच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. अभिषेक मडिगेरी यांनी अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी, डॉ. सुहास कांबळे, नम्रता लोंढे, निलम लांडगे यांच्यासह प्रचार फेरीत सहभागी होत सर्वांना हे आवाहन केले.
या संदर्भात अभिषेक विलास मडिगेरी यांनी स्पष्टीकरण देत मतदारांना आवाहन केले आहे की, माझे वडिल विलास हनुमंतराव मडिगेरी प्रभाग क्रमांक ८ (ड) जागेवर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून विलास मडिगेरी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत माझा डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. यापूर्वीच्या नियमानुसार डमी अर्ज निवडणूक आयोगामार्फत आपोआप माघार केला जात होता असा माझा समज होता.
परंतु, तसे झाले नसल्याचे लक्षात येताच मी माघार घेण्याकरिता निवडणूक कार्यालयात पोहोचलो. मात्र, काही मिनिटे उशीर झाल्याने हा अर्ज माघार घेता ऩ आल्याने प्रभाग क्रमांक ८ (ड) या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. तरी, मी प्रत्यक्ष ही निवडणूक लढवित नसून माझे वडिल विलास हनुमंतराव मडिगेरी हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. मतदारांनी कोणताही गैरसमज करून न घेता भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन अभिषेक मडिगेरी यांनी केले आहे.




