वाकड : वाकड, पुनावळे, ताथवडे आणि माळवाडी परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या प्रचाराने जोरदार उHeat निर्माण केली असून प्रभाग क्र. २५ मध्ये मशाल चिन्हाचा लखलखता प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. प्रभागातील नागरिक, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त आणि ठाम पाठिंबा पाहता विरोधकांची तगडी घुसमट होत असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सागर ओव्हाळ (अ गट) आणि चेतन पवार (ड गट) यांनी प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळ, सोसायटी टू सोसायटी, घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आहे. खोट्या आश्वासनांची सवय लावणाऱ्या आणि फक्त सत्ता टिकवण्यासाठी राजकारण करणाऱ्या पक्षांना जनता आता सरळ उत्तर द्यायला सज्ज असल्याचे प्रचारादरम्यान स्पष्ट दिसत होते
महिलांचा ठाम विश्वास – “मशालच हवी!”
नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करून भव्य स्वागत करत “मशाल” चिन्ह समोरील बटन दाबण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली. महिलांकडून मिळणारा जोशपूर्ण प्रतिसाद हा “खरा विश्वास, खरी निष्ठा आणि खरे नेतृत्व” या शिवसेनेच्या ओळखीचा पुरावा असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
जनता वैतागली; युती आणि सत्ताधाऱ्यांना स्पष्ट संदेश
विकासाच्या नावाने राजकारण करून सामान्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या युती सरकारवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पक्ष मिळून मिसळून आम्हाला फसवणारे नव्हे, तर समस्या सोडवणारे हवे,” असा स्पष्ट संदेश मतदारांनी उमेदवारांना दिला.
१५ जानेवारीला मशाल पेटणार
प्रचाराचा वेग, प्रचंड जनसमर्थन आणि महिलांच्या जबरदस्त उपस्थितीमुळे प्रभाग २५ मध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट आहे. “१५ जानेवारीला मशाल चिन्ह समोरील बटन दाबून शिवसेना पॅनेलला विक्रमी मतांनी विजयी करू,” असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.




