पिंपरी-चिंचवड : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मध्ये राजकीय तापमान वाढत असताना, भाजप विरोधात जाणून बुजून खोटा नॅरेटिव्ह तयार करून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांची दिशाभूल केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आता उलट त्यांच्यावरच येत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपकडून दिलेले “मेरिटचे उमेदवार” हा केवळ शब्द नव्हे विश्वास आहे, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशासनावर पकड असलेले नेतृत्व ठाम विश्वास आहे. असा जोरदार दावा भाजप समर्थकांद्वारे केला जात आहे.
“मेरिट” म्हणजे भाजपचे विकास काम – राष्ट्रवादीची कीड म्हणजे दिशाभूल
निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू असल्याची चर्चा प्रभागात रंगत आहे. विकासकेंद्रित नेतृत्वाला धक्का पोचवण्यासाठी मुद्दाम नकारात्मक प्रचार, कुजबुज आणि भ्रमनिर्मिती केली जात असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. “वास्तविक विकास, सेवा आणि लोकांशी नाळ जुळलेले नेतृत्व म्हणजेच मेरिट असते. फक्त आरोप करून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीला हे कधीच समजणार नाही,” अशी उपरोधक टीका सामान्य जनता करत आहे.
विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून नकारात्मक राजकारण!
प्रभागात पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, नागरी सुविधा यावर पालिकेतील सत्तेवर असणाऱ्या भाजपने प्रत्यक्ष काम केले, प्रकल्प राबवले, निधी आणला. अशावेळी विरोधात असणारा राष्ट्रवादी पक्ष केवळ टीकेपुरता मर्यादित राहिला, अशी टीका भाजप समर्थक करत आहेत. विरोधकांकडे विकासाचे ठोस मुद्दे नसल्याने “मेरिटचा गोंधळ” हा कृत्रिम विषय बनवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे.
जनतेचा विश्वास भाजपवर; राष्ट्रवादीवर नाराजी
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तमाम शहरवासीयांचा कल स्थिर, मजबूत आणि अनुभवी नेतृत्वाकडे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंधळलेल्या श्री व सौ यांना दिली उमेदवारी, अंतर्गत मतभेद आणि विकासाबाबत शून्य दृष्टीकोन असणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कार्य जनता पाहत आहे. “प्रभाग १६ मध्ये पराभवाची हवा कुणासाठी आहे तर ती राष्ट्रवादीसाठी,” अशी जोरदार कुजबुज सुरू आहे. जाणीवपूर्वक खोटा फीडबॅक, खोटी राजकारण शैली जनता ओळखते!
फसवणूक, चुकीचा फीडबॅक आणि मुद्दाम तयार केलेले खोटे वातावरण हे राष्ट्रवादीकडून केले जाणारे राजकारणाचे डावपेच असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. मतदानाच्या आधी जनतेला चुकीची माहिती देऊन मतप्रवाह बदलण्याचा प्रयत्न नागरिकांनी धुडकावून लावला आहे.
भाजपच देणार स्थिर नेतृत्व – जनता निर्धार
प्रभाग १६ मध्ये नागरिकांचा पार्लमेंट ते पालिका विश्वास भाजपवरच असल्याचे चित्र स्पष्ट असून, “गेम चेंज करणारे काम आम्ही केले, तर पराभवाचा रंग राष्ट्रवादीच्या अंगावरच दिसतो,” असा ठाम निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




