रावेत, ९ जानेवारी २०२६
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्यासाठी ‘लकी नंबर’ म्हणून १२१२ हा आकडा यंदाच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावेळी हा आकडा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता थेट इलेक्ट्रॉनिक बॅलेट मशीनवरील (ईव्हीएम) उमेदवारांच्या क्रमवारीतून समोर आल्याने चर्चेला अधिक धार मिळाली आहे.
ईव्हीएमवरील मांडणीत प्रभाग सोळा मधील शिवसेनेच्या उमेदवारासाठी आलेले ‘१२१२’ चा दुर्मिळ संयोग म्हणजे विरोधी पक्षातील उमेदवारांसठी धोक्याची घंटा आहे त्यांचे निवडणूक कधी जनता बारा वाजवणार अशाही चर्चा सुरू झाले आहेत. शिवसेनेच्या प्रभाग १६ रावेत, किवळे, मामुर्डी यांच्या संपूर्ण पॅनलमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण १ २ १ २ आकडी संयोग दिसून येत आहे.
अ गट बाळासाहेब ओव्हाळ – EVM क्रमांक – १
ब गट ऐश्वर्या राजेंद्र तरस – EVM क्रमांक. – २
क गट रेश्मा बापूजी कातळे – EVM क्रमांक – १
ड गट निलेश गुलाब तरस – EVM क्रमांक. – २
म्हणजेच बॅलेट मशीन असल्याने १२–१२ असा पॅटर्न पुन्हा एकदा तयार झाला आहे. हा योगायोग केवळ आकड्यांचा खेळ नसून, राजकीय दृष्टिकोनातून शिवसेना पक्षासाठी शुभसंकेत मानला जात आहे. हा शुभसंकेत की विजयाचा इशारा देणारा आहे? त्यामुळे समर्थकांमध्ये आत्मविश्वास दुणावला आहे.
हा निवडणूक काळातील ईव्हीएम मशीन वरील १२ : १२ संयोगाकडे पाहता पॅनल मधून सर्वाधिक चर्चेत राहणारे बापूजी कातळे यांच्या कार्य कुशलतेमुळे आणि युवकांचे संघटनात्मक ताकद असल्याने लाडक्या वहिनी व युवक समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १२ : १२ संयोग सकारात्मक ऊर्जेचा संकेत देतो,” अशी भावना अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. या आकडी पॅटर्नमुळे बापू कातळे यांच्या पॅनलबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, प्रचारातही नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे. आकड्यांपलीकडे राजकीय अर्थ राजकारणात आकड्यांना, चिन्हांना आणि योगायोगांना नेहमीच महत्त्व दिले जाते.
१२ :१२ संयोग प्रभाग सोळा मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या साठी विजयाची नांदी ठरणार आहे. तर विरोधकांसाठी धडकी भरवणारे आणि त्यांच्या प्रचाराचा बारा वाजवणार १२:१२ आकडी संयोग मतपेटीत कितपत उतरतो, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार असले तरी, शिवसेनेच्या पॅनलभोवती सध्या ‘पॉझिटिव्ह वेव्ह’ तयार झाल्याचे चित्र नक्कीच दिसत आहे




