वाकड – प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार चेतन पवार व सागर ओव्हाळ यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ वाकड येथे उत्साहात झाला. या प्रसंगी उमेदवारांचे जेसीबीवरून फुलवर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करत प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात करण्यात आली.
वाकड येथील म्हातोबा मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यानंतर उत्कर्ष चौक, दत्त मंदिर चौक, माऊली चौक, यमुना नगर कॉलनी, सद्गु गुरु कॉलनी, आदर्श कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, प्रभात कॉलनी परिसरात घराघरांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
यावेळी नागरिकांनी कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व रस्त्यांच्या समस्यांसह विविध स्थानिक प्रश्न मांडले. वर्षानुवर्षे एकाच नेतृत्वामुळे परिसरात विकासाचा वेग मंदावल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. यासाठी प्रभागात “बदल हवा – चेहरा नवा” अशी भावना व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी चेतन पवार यांना पाठिंबा जाहीर केला. चेतन पवार यांना महिला भगिनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या, तर युवकांनी उत्साहात स्वागत करत प्रचारमोहीमेत सहभागी झाले. त्यामुळे प्रभाग २५ मध्ये यंदा परिवर्तन घडण्याची चाहूल नागरिकांच्या प्रतिसादातून दिसून येत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी विनोदे, रामदास पवार, अविनाश पवार, संजय पवार, पांडुरंग शिंदे, किसन गराडे, शांताराम सपकाळ, राकेश पवार, बाळासाहेब पवार, किसन पवार, धनंजय पवार, कलाटे पाहुणे, विजय दगडे, रोहन वाघेरे, सुमित निकाळजे, गणेश विनोदे, संतोष कदम, बाळासाहेब ओव्हाळ, कमलेश ओव्हाळ, विनोद ओव्हाळ, राहुल पवार, राजू पवार, संतोष कदम, स्वप्नील पवार, कृष्णा पवार, संतोष पवार, अरुण पवार, अक्षय भोसले यांच्यासह वाकड, ताथवडे, पुनावळे मधील असंख्य युवक व कार्यकर्ते यावेळी सहभागी होते.



