मुंबई : गुढी पाडव्याचा दिवस मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच गाजवला आहे. कालच्या भाषणात राज यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. याचा अजित पवार यांनी राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात अशा शेलक्या शब्दात समाचार घेतला.
अजित पवार म्हणाले, राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांना नकला आणि टीका करण्याशिवाय काहीच येत नाही. त्यांनी एकदा परीक्षण करावं की त्यांचे आमदार त्यांना सोडून का गेले. नुसती भाषणं करुन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, राज ठाकरे हे केवळ पलट्या मारतात अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.