पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालत जोरदार भाषण केले होते. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा ऐकवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेकरून मनसेतच भूकंप झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका न पटल्याने आता पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.



