भारतात महागाईने आता कळस गाठला असून मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्यांचे जगणं तर कठीण झालं आहे. पण दररोज पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. आज इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. बुधवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. या वाढीनंतर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 10 रुपयांनी वाढ झाली आहे.
देशातील सर्वात जास्त दराने पेट्रोल हे परभणी जिल्ह्यात मिळत आहे. परभणीमध्ये 123.47 रुपये प्रति लिटरवर पेट्रोल पोहचलं आहे.तर डिझेल 106.04 रुपये दराने मिळत आहे.
बुधवारी मेट्रो शहरांमधील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत विकले जात आहे, तर सर्वात महाग डिझेल हैदराबादमध्ये 105.49 रुपये प्रति लीटर आहे. जर देशाबद्दल बोलायचे झाले तर, आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल सर्वात महाग म्हणजे 107.11 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तसेच, राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजे 122.93 रुपये प्रति लिटर आहे.