राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर या भेटीची जोरदार चर्चा सुरू असतानाच या बैठकीत काय चर्चा झाली यावर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
शरद पवार म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत दोन विषयांवर चर्चा केली. एक मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघांमधील प्रतिनिधींच्या जागा मागील दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहेत.
आम्ही आमचे दोन विषय पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले आहेत. त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही. मला आशा आहे की या विषयांवर ते गंभीरपणे विचार करतील आणि निर्णय घेतील,” असंही शरद पवारांनी सांगितले.



