राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भोंगे न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिली आहे. दुसरीकडे त्यांनी मदरशांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचाही आरोप केला. यानंतर होणाऱ्या आरोपांना राज ठाकरे आता ठाण्यात सभा घेत उत्तर देणार आहेत. मात्र त्याआधीच वातावरण तापल्याचं दिसत आहे.
मुंब्रा येथील डुमरीपाडा परिसरात मनसेची शाखा आहे. मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास तीन जणांनी या शाखेवर दगडफेक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हाती घेतलं आहे. दरम्यान दगडफेक करणारे नेमके कोण होते याची माहिती मिळालेली नाही. पण या घटनेमुळे राज ठाकरेंच्या सभेआधी वाद होण्याची चिन्हं आहेत.


