महाराष्ट्रात किडनी तस्करीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यातच आता पुण्यातही अशी किडनी तस्करी आणि फसवणूकीची घटना समोर आली आहे.
पुण्यात किडनी ट्रासंप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याची घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने फसवणूक करुन किडनी काढल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने तक्रारीत म्हटले की, 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून किडनी काढून घेतली मात्र पैसेच दिले नाहीत, असा आरोप किडनी दान केलेल्या एका महिलेने दलालाविरोधात केला आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेची शस्त्रक्रिया झाल्याचंही उघडकीस आली आहे. 15 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून किडनी काढून घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. 24 मार्च रोजी पुण्यातील रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. किडनी दान करणाऱ्या या महिलेने 29 मार्च रोजी तिचं रुग्णालयात नोंदवलेलं नाव खरं नसल्याचं सांगितले. या महिलेकडून यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.