पुणे : 3 एप्रिल 2022 रोजी पर्यावरण संवर्धन समिती पुणे च्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील डोंगरी भागातील पंचवीस माध्यमिक व जिल्हा परिषद शाळांना आंबवली जिल्हा परिषद शाळा,ग्रामसचिवालय,ग्रामपंचायत आंबवली व यशवंत माध्यमिक विद्यालय धामनंद या ठिकाणी जावून शैक्षणिक कामकाजासाठी अत्यंत आवश्यक अशा लॅपटॉप कॉम्प्युटर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक , शिक्षक व ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धन समिती व सौ विनिता दाते मॅडम यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . मुख्याध्यापक देसाई सर, पाटील सर, संतोष शिर्के सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती सदस्य श्री रुपेश कदम आणि श्री संदिप सकपाळ सर यांनी विशेष लक्ष दिले.



