मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्याबाजुने लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे. सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले आहेत. दरम्यान गिरगाव कोर्टात सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना वाढीव पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलांचे युक्तिवादाद्वारे प्रयत्न सुरु आहेत.
तर सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी यास प्रतिवाद सुरु केला होता. घरत यांनी ११ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत ठेवण्यात येणार आहे.


