मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भोंग्यांच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात शांतता आहे. पण काल महाराष्ट्रात शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला. पण पोलीस शांत आणि संयमी आहेत. आम्ही तणावाचं वातावरण होऊ दिलं नाही. यापुढे होऊ देणार नाही. राम आणि हनुमानाच्या नावाने दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता. नवे हिंदू ओवैसी ते करत आहेत.
महाराष्ट्रातील ओवैसी कोण आहेत हजार भोंग्यावरून स्पष्ट झालं आहे. याविषयावर निवेदन दिलं जाऊ शकलं असतं, चर्चा केली असती. पण भाजपच्या मनातील राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भोंग्याचं वातावरण सुरू होतं. कालच्या निकालाने त्याला थारा दिला नाही. उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने ओवैसीला पुढे केलं. तेच काम भाजप महाराष्ट्रात नव हिंदू ओवैसीकडून करून घेत आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.



