महाराष्ट्र माझा, १८ एप्रिल
नाशिक जिल्ह्यात मशिद परिसरात कोणतेही भोंग्यासाठी परवानी घ्यावी लागणार आहे. यासाठी नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे नवे आदेश दिले आहेत. मशिद पासून शंभर मीटर अंतरावर भोंगे लावण्यासाठी परवानगी नाही. तसे करण्यासाठी आता पोलीस परवानगी घ्यावी लागेल. शंभर मीटर परिसरात हनुमान चालीसा करिता आवाजाची मर्यादा लावण्यात आली आहे. तसेच विनापरवाना काही केल्यास जेलवारी आणि सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.
यावर मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले की, मुळात हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याचा देश आहे. २००५ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अशा भोग्यावर कारवाई केली नाही. राज्य सरकारने हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांवर ती नव्हे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे आधी तुम्ही बघा नंतर आम्ही ठरवू. कायद्याचं राज्य असल्याने कायद्याचे प्रत्येकाने पालन करावे अशी भूमिका दातीर यांनी घेतली आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडे आदेश काढले याबाबत बोलताना दातीर म्हणाले बाकीच्या धर्मियांसाठी कुठलेही नियम लावायचा असेल तर त्याच्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. शंभर फुटापर्यंत 100 मीटरपर्यंत अशा पद्धतीने परवानगी घ्यावी लागेल असा नियम आम्ही मानत नाही. सन्मानीय राजसाहेबांनी ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. तोपर्यंत या सरकारने मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाही अर आम्ही पोलिस आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत तरी त्याच्या दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा मशिदी समोर लावणार आहे. अगोदर पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा मग स्वागत करू. मात्र त्यांनी उतरवले नाही आमच्या दृष्टीने पोलिसांचे आदेशाला महत्त्व देणार नाही असे दातीर यांनी म्हटले आहे.