महाराष्ट्र माझा, १८ एप्रिल
राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष राहिलेला भाजप मागील तीन वर्षापासून सत्तेबाहेर केला गेला आहे. त्यामुळे त्याची सल नेहमी भाजपला बसताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे भीष्माचार्य शरद पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजप शर्तीचे प्रयत्न करत आहे.
मागील आठवड्यात झालेला घटनाक्रम पाहता सुरुवातीला शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक वरती एसटी कामगारांच्या कडून केलेला हल्ला आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीयवाद शरद पवार यांच्यामुळेच तयार झाला या दोन घटनांमुळे विरोधी पक्ष याच्याकडून शरद पवारांना डॅमेज करण्याची व्यूहरचना आखली जात आहे का? अशी चर्चा उपस्थित होताना दिसत आहे.
शरद पवार यांच्या वरती वैयत्तिक आरोपांची चिखलफेक सुरू झाली. यात अजित पवारांच्या बहिणीच्या घरी ईडी ची रेड पडते पण सुप्रिया सुळे यांच्या घरी नाही, असं कसं असा प्रश्न राज ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलले. अशी वक्तव्य सामान्य माणसाच्या जिव्हारी लागतात. हे शरद पवारांचे पत्रकार परिषदेत जाणवलं होतंच. पण मग कदाचित हीच खेळी विरोधी पक्षाकडून केली जात नसेल हे कशावरून… शरद पवार यांचा महविकास आघाडी होण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हल्ल्याचा केंद्रबिंदू शरद पवार असतात. समजा शरद पवार यांनी वेगवेगळ्या राजकीय निर्णय घेतला तर त्या निमित्ताने 105 आमदार असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपला पुन्हा सत्ता मिळू शकते आणि त्यामुळेच शरद पवार यांना लक्ष्य केले जात आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
शरद पवारांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पुलोद सरकार स्थापन केले होते. तसेच अशक्य ते शक्य करून दाखवत महाविकास आघाडीचे सरकार ही स्थापन केले. पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखविला. पवार यांच्या सामाजिक सचोटीवर कधी बोट ठेवलं गेलं नव्हतं. पण आता मात्र विरोधक चारही बाजूंनी पवार यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान ईडीला भारी पडलेले शरद पवार पुन्हा विरोधकांना चोख प्रत्युत्तर देणार का? की महाविकास आघाडीचे पोटावर भाजप भारी पडणार यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.