नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून घोषित केलेला स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला जाण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापूर या शहरांसह देशातील १०० शहरांचे रुपडे पालटण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतु यापुढे नवीन कामाचे टेंडर न काढण्याचे आदेश राज्यातील महापालिका आयुक्तांना मिळाल्याने यापुढे प्रकल्पाचे काम थांबविले जाईल असे संकेत आहेत.
ठाण्यात ३८७ कोटी खर्च
एक हजार कोटींचा आराखडा दिला होता. या प्रकल्पांवर ३८७ कोटी खर्च झाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने १,४४५ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. स्टेशन परिसर विकासावर ४९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नाशिक : : ८५० कोटींची कामे सुरू सात वर्षांत अवधी ८ कामे पूर्ण झाली. त्याची किमत ४६ कोटी आहे, तर ८५० कोटी रुपयांची १७ कामे सुरू आहेत.
सोलापुरात ३२ कामे पूर्ण
१,२५० कोटी रुपयांच्या ४८ कामांचे नियोजन केले होते. यातून गेल्या पाच वर्षांत ३२ कामे पूर्ण झाली.
पुण्यात ८०% कामे पूर्ण
१ हजार कोटींपैकी ८०० कोटींची कामे मार्च २०२२अखेर पूर्ण झाली. २०० कोटी रुपये अखर्चित आहेत. पुणे व पिंपरी | चिंचवडमध्ये ६२ प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
कोणत्या शहरात किती रुपये खर्च?
३८७ कोटी ठाणे
८५० कोटी नाशिक
८०० कोटी पुणे
३१७ कोटी औरंगाबाद
५२० कोटी नागपूर


