ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणी वाढल्यात. गणेश नाईक यांनी तो मुलगा आपलाच असल्याचं कबूल केल्याचं पीडितेच्या वकिलांनी म्हंटलं आहे. शिवाय 27 वर्षांपासून महिलेशी संबंध असल्याचं नाईकांनी कबूल केल्याचा दावाही पीडितेच्या वकिलांनी केला आहे.
दरम्यान गणेश नाईक यांच्यावर अटकेची टागंती तलावर आहे. महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपप्रकरणी नाईकांचा अंतरिम जामीन नाकारण्यात आला आहे. गणेश नाईकांनी अटकपुर्व जामिनासाठी ठाणे सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र पोलिसांकडून जबाब नोंदवेपर्यंत अंतरिम जामीन नाही असा निर्णय कोर्टानं दिला आहे. आता नाईकांच्या जामिनावर २७ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

