मुंबई : सिल्व्हर ओक हिंसक आंदोलन प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते आणि ११५ आंदोलक कर्मचाऱ्यांना अखेर जामीन मिळाला आहे. सदावर्ते यांना ५० हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार तर सर्व ११५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
खरंतर, या प्रकरणात सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचारीही अडकले होते. कर्मचारी यातून सुटले असले तरी सदावर्ते मात्र कोल्हापुरात चांगलेच अडकले आहेत. तिथे त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते झालेले सदावर्ते आता तरी बाहेर येऊ शकतात का? पुढचा मुक्काम कुठे असेल आणि जामीन मिळालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचं काय होईल? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.


