मुंबई : नवनीत राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. मोहित कंबोज शिवसैनिकांना डिवचण्यासाठी तिथे आले होते. तसेच मातोश्री परिसराची ते रेकी करत होते, त्यावेळी हा हल्ला झाल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे.

