कोल्हापूर : आपल्या देशात अनेक राजे होऊन गेलेत. चंद्रगुप्त मौर्यचं राज्य होऊन गेलं, मोगलांचं राज्य होऊन गेलं, अदिलशाहाचं राज्य येऊन गेलं. पण, 300-400 वर्षांनंतरही सामान्य माणसाच्या अंतकरणात छत्रपती शिवाज महाराजांचं नाव अढळ आहे. शिवाजी महाराजांचं रयतेचं राज होतं, ते हिंदवी स्वराज होतं. त्यामुळं शिवरायाचं राज्य प्रत्येकाच्या मनात कायम आहे, हे कुणी सांगायची गरज नाही
, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.
ते कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या सभेत बोलत होते. शरद पवार पुढं म्हणाले, महात्मा फुले, शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावं का नाही घ्यायची? असा सवालही त्यांनी सभेत उपस्थित केला. सामान्य माणसाच्या अंतकरण:त छत्रपती शिवाज महाराजांचं नाव आजही अढळ आहे. या महाराष्ट्र भूमीत शाहू महाराजांनी अनेकांशी संघर्ष केला आहे.
शाहूंनी सामान्यांचा कधीच कैवार सोडला नाही. तसेच देशासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेकरांचं योगदान देखील खूप मोठं आहे. पण, आपण आजही काही लोक त्यांचा व्देष करतात, हे चुकीचं आहे. देशाचं भविष्य आंबेडकरांनी उज्वल केलं आहे. ज्यांना हे महापुरुष समजले नाहीत, त्यांना महाराष्ट्र काय समजणार? असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जोतिबा फुलेंनी सांगितला, असंही त्यांनी आवर्जुन यावेळी स्पष्ट केलं.



