भाजपच्या फडात तुणतुणं हातात घेऊन वाजवणाऱ्याची भूमिका सध्या सदाभाऊ खोत यांची आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. काल सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे, असे वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्याला आज आमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.
डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी अमोल मिटकरी आले होते. यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.


