- रायगड जिल्हा कुमार गट निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने अलिबाग येथील शहापूर येथे दि.२६ व २७ एप्रील रोजी रायगड जिल्हा कुमार गट निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या रायगड जिल्ह्यातील १२८ संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेमध्ये रोहा येथील जय बजरंग संघाने अजिंक्यपद पटकावले द्वीतीय क्रमांक उचिडे येथील जय हनुमान संघाने तर कबड्डीच्या इतिहासात दक्षिण रायगड जिल्ह्यातील बोर्लीपंचतन येथील चिंचमाता क्रीडा मंडळाच्या युवा संघाने या स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी होउन बलाढ्य व नावाजलेल्या संघांचा पराभव करुन सेमी फायनलमध्ये धडक मारुन तृतिय क्रमांक पटकावला.
खेळाडूंची कठोर मेहनत संघ व्यवस्थापन व पदाधिकारी यांचे योग्य मार्गदर्शन व नियोजन त्याचबरोबर असंख्य क्रिडाप्रेमींच्या उत्साह वाढविणारा पाठींबा या बळावर चिंचमाता क्रिडा मंडळाला हा सन्मान प्राप्त झाला. कुमार गटात जिल्हा स्तरावर निवड चाचणी स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे संघाने निवड समितीचे लक्ष वेधले असुन यातिल काही खेळाडूंची जिल्हास्तरावर नक्कीच निवड होइल असा विश्वास संघाला वाटत आहे. या यशामुळे खेळाडू,संघ व्यवस्थापन व पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.