मुंबई : शिवसेनेच्या विशाल सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी १ मे रोजी झालेल्या भाजपच्या सभेत चुकून मुंबई बद्दल केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले की, जीभ घसरली म्हणून काही मुद्दे सोडता येणार नाहीत, आपण १ मे साजरा करत होतो, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठांवर आलं, जी त्यांच्या मालकाची इच्छा आहे, ते हे बोलून गेले. आम्ही मुंबई वेगळी करणार तुमच्या मालकासकट सात पिढ्या जरी आल्या तरी ते शक्य नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुंबई मराठी मानसाने रक्त सांडून, मराठी माणसाने हौतात्म्य पत्करून मिळवली आंदण म्हणून नाही. मुंबईचे लचके तोडण्याच्या प्रयत्न करत तर तुकडे करू असे शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. देशातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मागवलीये का, तुम्ही आम्ही मागितली का? कोणी मागितली, हा मुंबई तोडण्याचा डाव आहे, अशे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

