मुंबई : मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाई जसा गांधीजी बनला होता. तसा एक बाळासाहेब ठाकरे सध्या फिरत आहे. कधी खांद्यावर शाल घेऊन फिरतो तर कधी कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतो. त्याला आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटत आहे. हा केमिकल लोटा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाव न घेता राज ठाकरे यांना टोला हाणला.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत मशिदीवरील भोंगे बंद करण्याचे आव्हान केले होते. तसेच त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. आपल्यालाच हिंदुत्वाची काळजी आहे, असे त्यांनी भासवले होते. अनेक नेते राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे बोलत असे म्हणत होते. त्यांची बोलण्याची पद्धत बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी असल्याचे अनेकजण म्हणाले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

