भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत याचा निषेध केला. आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चोंडीला जात होते. तेव्हा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
“अभिवादन करणारच!”
अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. “काहीही झालं तरी मी चौंडीला जाणार आणि अहिल्याबाईंना अभिवादन करणारच”, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. “चौंडीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यांना परवानगी दिली जाते मग आम्हाला अभिवादन करण्यापासून रोखण्याचं कारण काय? हो कुठल्या संविधानात बसतं”, असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे.