राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काही मुद्द्यांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे नाकारले. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस पक्षामुळे माझे खूप नुकसान झाले. हा पक्ष म्हणजे बुडतं जहाज आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. ते बिहारमध्ये हाजीपूर येथे बोलत होते.
यावेळी बोलताना, काँग्रेस पक्षामुळे माझे रेकॉर्ड खराब झाले. हा पक्ष स्वत:मध्ये सुधारणा करत नाही. त्यामुळे हा पक्ष आमचेही नुकसान करेल. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र सध्या काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. मी २०११ ते २०२१ या काळात एकूण ११ निवडणुकांमध्ये काम केले. यामध्ये एका निवडणुकीसाठी मी यांच्यासोबत काम केले आणि ही निवडणूक हारलो. त्यामुळे मी तेव्हापासूनच ठरवले होते की यापुढे काँग्रेससोबत काम करणार नाही. मात्र या पराभवानंतर मी खूप काही शिकलो असे प्रशांत किशोर म्हणाले.