सोलापूर : अवघ्या १६ महिन्यांच्या मुलीस दारू पाजून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करत, नंतर तिचा अमानुषपणे खून करून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूरच्या विशेष न्यायालयाने राजस्थानी दाम्पत्याला दोषी ठऱवले आहे.
धोलाराम बिष्णोई (वय २६) आणि त्याची पत्नी बिष्णोई (वय २०, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. हैदराबाद) अशी दोषी ठरवण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. विशेष न्यायाधीश यू. एल. जोशी यांच्या समोर या संवेदनशील खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी धोलारामा बिष्णोई व त्याची पत्नी पुनीकुमारी दोघेही मूळ राजस्थानचे असून मोलमजुरीसाठी तेलंगणात सिकंदराबाद येथे स्थायिक झाले होते. ३ जानेवारी २०२२ रोजी पहाटे आरोपी धुलीराम याने विकृत मनोवृत्तीतून अवघ्या १६ महिन्यांच्या कोवळ्या मुलीला झोपेतून उठवून दारू पाजली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तेव्हा प्रचंड वेदना होऊन पीडित तान्हुली रडू लागली.
त्यामुळे धोलाराम याने तिचा आवाज बंद करण्यासाठी तिचा ओढणीने गळा आवळून अमानुषपणे खून केला. नंतर लगेचच धोलीराम व पुनीकुमारी दोघेही मृत मुलीला कापडात गुंडाळून रेल्वेने राजस्थानला मूळ गावी जाण्याकरिता निघाले. वाटेत रेल्वेतील काही प्रवाशांनी शंका आल्याने सोलापूर रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरकडे तक्रार केली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी धोलीराम व पुनीकुमारीसह पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला