कोल्हापूर : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वच पक्षांच्या हालचालींना या निवडणुकीमुळे वेग आला आहे. महाविकास आघाडीने आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले असून भाजपाही निवडणुकीसाठी सज्ज आहे. दरम्यान, या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचा आरोप विविध नेत्यांकडून होत आहे. या सगळ्यातच आता सतेज पाटलांच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपाने राज्यसभेची निवडणूक लादल्याची भावना मविआचे नेते व्यक्त करत आहेत. सतेज पाटलांनीही अशी भावना व्यक्त केली असून ते म्हणाले, “महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करेल. भाजपने राज्यसभेची निवडणूक लादलेली आहे .ही निवडणूक बिनविरोध करणं हे अभिप्रेत होतं. महाविकास आघाडीकडे क्लियर नंबर आहेत . मतांद्वारे विजय स्पष्ट होईल . या सरकारला कुठलाही धोका नाही किंबहुना भाजपचीच मतं बाजूला जातील. त्यामुळे भाजपाने आपले आमदार सांभाळले पाहिजेत.